जर तुमच्या दुकानामध्ये ग्राहक येत नसतील किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर वास्तूशास्त्रात सांगितल्यानुसार काही गोष्टी तुमच्या गल्ल्यामध्ये ठेवाव्यात.
वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या दुकानातील गल्ल्यामध्ये लाल कापडात बांधलेले चांदीचे नाणे, सुपारी आणि बडीशेप ठेवावे.
चांदीला शुभ आणि सकारात्मक मानले जाते. यासाठी एक चांदीचे नाणे नेहमी गल्ल्यामध्ये ठेवले पाहिजे. तुम्ही याला लाल कपड्यात बांधून ठेवले पाहिजे.
वास्तुशास्त्रानुसार, सुपारी शुभ आणि पवित्र असते. हेदेखील दुकानाच्या गल्ल्यात ठेवणे फायदेशीर मानले जाते. यामुळे दुकानात वाढ होते.
आर्थिक नुकसानापासून वाचण्यासाठी आणि व्यवसायामध्ये यश मिळविण्यासाठी एका लाल कपड्यामध्ये थोडीशी बड़ीशेप बांधून ती 43 दिवस ठेवा आणि त्यानंतर मंदिरात दान करा.
गल्ल्याच्या समोर कोरपडीचे रोप ठेवू नका. कारण यामुळे नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
गल्ला अशा दिशेला ठेवा की त्याची दिशा उत्तर आणि उत्तर पूर्व दिशेला असायला हवी. दुकानाचा गल्ला किंवा कॅश काउंटर बाथरुम, स्टोर रुम आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ नसावे