थंडीच्य़ा दिवसात जर तुम्हीही बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी.
Picture Credit: Pinterest
धुक्याची चादर, हिरवीगार झाडी आणि अस्सल गावचं चुलीवरच जेवण. साताऱ्यातील हे ठिकाण म्हणजे तापोळा.
तापोळा गाव तसं फार प्रसिद्ध वैगरे नाही हा पण निसर्गसैंदर्याने नटलेलं आहे हे नक्की.
थंडीचे चार महिने म्हणजे पर्यटनाचा काळ असतो. या दिवसात पर्यटनामुळे स्थानिक व्याुपारांना देखील चालना मिळते.
मन वेधून घेणारा नदी आणि तलावाजवळील परिसर असल्याने इथे बोटींग देखील केली जाते.
तुम्ही जर इतिहासप्रेमी किंवा ट्रेकर असाल तर, तापोळ्यापासून जवळच किल्ले वासोटा आहे.
हिरवीगार वनराई असा हा निसर्गाचा अविष्कार अनुभवायचा असल्यास एकदा तरी तापोळ्य़ाला जायलाच पाहिजे.