एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात मीठ घाला व पास्ता ८-१० मिनिटं शिजवून गाळून घ्या.
Picture Credit: Pinterest
वेगळ्या पॅनमध्ये थोडं बटर टाकून सगळ्या भाज्या थोड्याशा परतून घ्या. बाजूला ठेवा.
Picture Credit: Pinterest
कढईत बटर गरम करून त्यात मैदा घाला. मंद आचेवर सतत हलवत २-३ मिनिटं परतवा.
Picture Credit: Pinterest
परतलेल्या मैद्यात थोडंसं थोडंसं गरम दूध घालत सतत ढवळत राहा, जेणेकरून गाठी तयार होणार नाहीत.
आता त्यात मीठ, काळी मिरी, आणि किसलेलं चीज घालून सॉस घट्ट होईपर्यंत शिजवा.
तयार सॉस मध्ये परतलेल्या भाज्या व उकडलेला पास्ता घालून नीट मिसळा.
वरून ऑरिगेनो, चिली फ्लेक्स आणि हवं असल्यास अजून थोडं चीज टाकून गरमागरम सर्व्ह करा.