मैदा, मीठ, सोडा, बेकिंग पावडर, दही व थोडे तेल घालून मऊसर पीठ मळा व २-३ तास झाकून ठेवा.
Picture Credit: Pinterest
उकडलेले बटाटे मॅश करून त्यात कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ व मिरपूड मिसळून स्टफिंग तयार करा.
Picture Credit: Pinterest
यानंतर मळलेल्या पीठाचे समान गोळे करून घ्या.
Picture Credit: Pinterest
प्रत्येक गोळा थोडा लाटून त्यात स्टफिंग भरा व पुन्हा बंद करून हलक्या हाताने लाटा. वरून चिरलेली कोथिंबीर लावा.
Picture Credit: Pinterest
गरम तव्यावर किंवा तंदूरवर कुलचा शेकायला ठेवा.
Picture Credit: Pinterest
वर थोडे तूप लावून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शेकून घ्या.
Picture Credit: Pinterest
गरमागरम कुलचा दही, लोणचं किंवा छोलेच्या भाजीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest