एका बाउलमध्ये चिकन, दही, हळद, लाल तिखट, गरम मसाला, आले-लसूण पेस्ट आणि मीठ ३० मिनिटांसाठी मॅरिनेट करून ठेवा.
Picture Credit: Pinterest
मैद्यामध्ये मीठ व थोडं तेल घालून मऊ पीठ मळा. छोट्या गोळ्या करून चपातीप्रमाणे लाटून तवा वर भाजा
Picture Credit: Pinterest
एका बाजूने अंडं फोडून चपाती पसरवा आणि दुसऱ्या बाजूनेही भाजा
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करून त्यात मॅरिनेट केलेलं चिकन टाका. ते चांगले शिजेपर्यंत मध्यम आचेवर परतून घ्या.
स्लाईस केलेला कांदा लिंबाच्या रसात, थोडा मीठ व मिरपूड घालून मिक्स करा. सोबत मॅयोनीज किंवा टोमॅटो सॉस तयार ठेवा.
पराठ्यावर आधी सॉस लावा, मग चिकन भरावा, कांदा टाका आणि वरून कोथिंबीर शिंपडा.
पराठा घट्ट रोल करून गरमागरम सर्व्ह करा. हवे असल्यास फॉईलमध्ये गुंडाळून डब्यातही देता येते.