मैदा, दही, साखर, मीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, तेल घालून पाणी टाकत मऊसर पीठ मळा. झाकून १ तास बाजूला ठेवा.
Picture Credit: Pinterest
उकडलेले बटाटे मॅश करा. त्यात कांदा, कोथिंबीर, तिखट, धणेपूड, आमचूर पूड, हिंग आणि मीठ मिसळा. चव चेक करा.
Picture Credit: Pinterest
भिजवलेल्या पीठाचे आणि सारणाचे छोटे गोळे वेगवेगळे करा.
Picture Credit: Pinterest
पीठाचा गोळा घेऊन थोडा लाटा, मधोमध सारण ठेवा आणि चांगले बंद करा. हलक्याच हाताने परत लाटा.
Picture Credit: Pinterest
तवा गरम करून कुलचा मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा.
Picture Credit: Pinterest
भाजून झाल्यावर कुलच्यावर बटर लावा आणि लसूण कोथिंबीर लावल्यास चव वाढते.
Picture Credit: Pinterest
तयार स्टफ्ड कुलचा गरमागरम छोले, रायता किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest