टोमॅटो सुपची चविष्ट आणि सोपी रेसिपी!

Life style

31 JULY, 2025

Author:  नुपूर भगत

टोमॅटो धुऊन, २ भागात चिरून एका भांड्यात पाणी घालून ८-१० मिनिटं उकळा आणि गार झाल्यावर साली काढून घ्या.

टोमॅटो उकळणे

Picture Credit: Pinterest

साल काढलेल्या टोमॅटो, लसूण, आलं आणि कांदा मिक्सरमध्ये मऊसर वाटून घ्या.

 टोमॅटो प्युरी

Picture Credit: Pinterest

वाटलेली प्युरी चाळणीने गाळा जेणेकरून सूप गुळगुळीत होईल.

 प्युरी गाळणे

Picture Credit: Pinterest

कढईत बटर गरम करून त्यात गाळलेली प्युरी घालून मध्यम आचेवर शिजवा.

सूप शिजवणे

Picture Credit: Pinterest

या मिश्रणात मीठ, साखर, काळी मिरी पूड घालून ढवळा. चवीनुसार थोडं पाणी घालून ५ मिनिटं शिजवा.

 मसाले घालणे

Picture Credit: Pinterest

कॉर्नफ्लोअर पाण्यात मिसळून सूपमध्ये हळूहळू घालून सतत ढवळा. सूप थोडं घट्ट होईपर्यंत २-३ मिनिटं उकळा.

घट्टपणा आणणे

Picture Credit: Pinterest

गरमागरम टोमॅटो सूप सर्व्हिंग बाऊलमध्ये काढा. वरून थोडी कोथिंबीर किंवा क्रीम घालून सजवा.

 सर्व्ह करणे

Picture Credit: Pinterest