Tata Sierra EV ची क्रॅश टेस्ट

Automobile

01 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

क्रॅश चाचणी

लाँचच्या वेळी, कंपनीने एक क्रॅश टेस्ट सादर केली, ज्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले. ही चाचणी अगदी एका सामान्य रस्त्यावरील अपघातासारखी दिसत होती. 

Picture Credit: Tata evofficial 

दोन ट्रकच्यामध्ये सिएरा

या चाचणीत, सिएरा ईव्ही दोन ट्रकच्या मध्ये अडकलेली दिसली. याचा अर्थ असा की, SUV ला मागून एका ट्रकने धडक दिली आणि सिएरा समोर पार्क केलेल्या ट्रकवर आदळली.

वास्तविक क्रॅश चाचणी

ही एक प्रकारची प्रत्यक्ष अपघात चाचणी होती, जी द्रुतगती मार्गांवर किंवा महामार्गांवर, विशेषत: धुक्याच्या वेळी होणाऱ्या अपघातांसारखीच होती.

व्हिडिओमध्ये सुरुवातीला टाटा सिएरा EV एका थांबलेल्या टिपर ट्रकच्या दिशेने येताना दिसते. असे दिसते की ही SUV थेट ट्रकला धडकणार आहे.

क्रॅश चाचणी कशी घेण्यात आली?

अगदी शेवटच्या क्षणी ADAS सिस्टीम कार्यान्वित होते आणि आपोआप ब्रेक लावून गाडी थांबवते.

ADAS 

भरधाव वेगात असलेला एक छोटा मालवाहू ट्रक सिएरा EV मागून धडकतो. या धडकेमुळे सिएरा EV पुढे उभ्या असलेल्या एका टिपर ट्रकवर आदळते.

अशी झाली टक्कर

कंपनीचा दावा आहे की चाचणीनंतर सिएरा EV पॅसेंजर केबिन सुस्थितीत राहिली आणि बॅटरी पॅकलाही कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. 

केबिन आणि बॅटरी पॅक

कंपनीच्या म्हणण्यांनुसार मागचा दरवाजा पूर्णपणे खराब झाला होता, पण बाकीचे सर्व दरवाजे सहज उघडले.

टेलगेट खराब झाले

टक्कर होत असताना पुढच्या एअरबॅग्ज तात्काळ उघडल्या आणि आत बसलेल्या पॅसेंजर डमीला सुरक्षित ठेवण्यात पूर्णपणे यश आले.

एअर बॅग्ज उघडल्या

मागून धडक होण्यापूर्वीच ADAS प्रणालीने ब्रेक लावल्यामुळे सिएरा EV समोरच्या ट्रकला पूर्ण ताकदीने धडकली नाही. 

ADAS प्रभाव 

नंतर होणाऱ्या धडकेचा प्रभाव लक्षणीयरित्या कमी झाला आणि वाहनाला अतिरिक्त सुरक्षा मिळाली.

टक्करचा प्रभाव कमी झाला