Published July 19 2024
BY Shubhangi Mere
टीम इंडिया हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली आज पाकिस्तानचा सामना करणार आहे.
आजच्या सामन्यांमध्ये भारतीयांच्या नजरा स्मृती मानधनावर असणार आहेत.
आजच्या सामन्यांमध्ये कोणत्या खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.
त्याचबरोबर शेफाली वर्मा कशा प्रकारे कामगिरी करेल यावर चाहत्यांच्या नजरा असणार आहेत.
आजच्या सामन्यामध्ये विजय मिळवून विजयी सलामी देण्याची भारताच्या महिला क्रिकेट संघाला संधी आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पूजा वस्त्रकार हिने दमदार कामगिरी केली होती तिला आज प्लेइंग ११ मध्ये जागा मिळेल की नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल