www.navarashtra.com

Published  July 19, 2024

By  Dipali Naphade

दही-दुधाशिवाय कॅल्शियमयुक्त पदार्थ घ्या जाणून

दुधामध्ये भरपूर कॅल्शियम असते मात्र याशिवाय अजूनही असे अनेक पदार्थ आहेत जे शरीराला उत्तम कॅल्शियम मिळवून देतात

कॅल्शियम कसे मिळते

आपल्या रोजच्या डाएटमध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करून घ्यावा, ज्यामध्ये कॅल्शिमय असते

हिरव्या पालेभाज्या

ब्रोकली आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असून यामध्ये कॅल्शियमचा चांगला स्रोत आढळतो

ब्रोकली

डाळ आणि बियांमध्ये अनेक प्रोटीन्स, फायबर आणि कॅल्शियम आढळते. याचा डाएटमध्ये समावेश करावा

डाळी आणि बिया

तुम्ही रोज दुधातून वा पाण्यातून चिया सीड्स खाऊ वा पिऊ शकता. यातून चांगले कॅल्शियम मिळते

चिया सीड्स

रोज सकाळी तुम्ही बदामाचे सेवन करणेही फायदेशीर ठरू शकते. यामुळे मेंदूचाही विकास होतो

बदाम

रोज सकाळी २ अंजीर भिजवून खाल्ल्यास फायदा मिळतो. अंजीरमध्ये 27 मिलीग्रॅम कॅल्शियम असते

अंजीर

एका संपूर्ण संत्र्यामध्ये सुमारे 60 मिलीग्राम कॅल्शियम असते, त्यामुळे ते सर्वात कॅल्शियम समृद्ध फळांपैकी एक मानले जाते

संत्रे