www.navarashtra.com

Published Jan 28,  2025

By  Shubhangi Mere

भारताचा संघ आज इंग्लंडविरुद्ध तिसरा T२० सामना खेळणार आहे.

Pic Credit -  BCCI Social Media

भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शामी याला इंग्लंडविरुद्ध मालिकेत प्लेइंग ११ मध्ये संधी मिळाली नाही, त्याचे चाहते त्याला खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

मोहम्मद शामी

भारताचा खेळाडू हार्दिक पांड्या टीम इंडियासाठी अष्टपैलू भूमिकेत दिसला आहे, या मालिकेत त्याला अजुनपर्यत मोठी खेळी खेळण्याची संधी मिळाली नाही.

हार्दिक पांड्या

टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसनने झालेल्या मागील मालिकेत कमाल केली होती. या मालिकेमध्ये तो विशेष कामगिरी करू शकला नाही.

संजू सॅमसन

इंग्लंडविरुद्ध मालिकेमध्ये भारताचे उपकर्णधारपद अक्षर पटेलकडे सोपवण्यात आले आहे.

अक्षर पटेल

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे. टीम इंडियाला तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

सूर्यकुमार यादव

भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह त्याच्या १०० विकेट्स टप्पा पार कारण्यासाठी सज्ज झाला आहे.

अर्शदीप सिंह

भारताचा स्टार युवा फलंदाज तिलक वर्माने मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात दमदार शतक ठोकून विक्रम नावावर केला आहे.

तिलक वर्मा

टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज रवी बिष्णोईने मागील सामन्यात महत्वाचे योगदान शेवटच्या सामन्यात केले होते, यावेळी त्याचे देशात कौतुक करण्यात आले.

रवी बिष्णोई

अभिषेक शर्माने इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात दमदार खेळी खेळून टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे.

अभिषेक शर्मा

वेट लॉससाठी अशाप्रकारे डाएटमध्ये समाविष्ट करा कांदा