छोट्या पडद्यावरील सर्वांची लाडकी सून म्हणजे जुई गडकरी. तिच्या फॅशनने चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली.
दमदार अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या जुईने आपल्या गोड हास्याने आणि साध्या स्वभावाने प्रेक्षकांच्या मनात घर केले.
काही तासांपूर्वीच जुईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्ल्यू कलरच्या साडीतील काही फोटो शेअर केले.
शेअर केलेल्या फोटोंमुळे चाहत्यांमध्ये जुईच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे.
जुई गडकरीचा नुकताच वाढदिवस झाला. वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
अभिनेत्रीने तिचा ३८ वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. फोटो शेअर करत तिने चाहत्यांचे आभार मानले.
जुईने हे फोटो शेअर करत ‘३८ व्या वर्षांत पदार्पण केलं असून सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद’ असं म्हटलं आहे.
जुईने निळ्या रंगाच्या साडीमधील खास फोटो शेअर केले असून या फोटोंमध्ये तिचा मोहक अंदाज पाहायला मिळत आहे.
दरम्यान, जुईने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगला प्रतिसाद मिळत आहे.