नवरात्र म्हणजे आदिशक्तीची उपासना.
Picture Credit: Pexels
आदिशीक्ती म्हटलं की आठवतात ते तिचे साडेतीन शक्तीपीठं.
या शक्तीपीठांना हिंदू धर्मात मोठं महत्व आहे.
असं जरी असलं तरी कोकणात देखील देवीची अशी काही मंदिरं आहेत जी जागृत देवस्थान आहेत.
नवारात्रीच्या निमित्ताने कोकणतील देवीच्या देवस्थानाचं महत्व जाणून घेऊयात.
मालवण, सिंधुदुर्ग येथील काळसे गावात असलेले हे देवस्थान नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखले जाते.
सिंधुदुर्ग, कुडाळ आणि गोवा येथील गावकऱ्यांची ही देवी कुलदैवत आणि ग्रामदेवता आहे.
असं म्हणतात की या देवीचा वास वारुळात आहे त्यामुळे मंदिरात देवीच्या नावाचं वारुळ देखील आहे.
दाभोळ येथील श्री चंडिका देवी मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातीलपांडवकालीन जागृत देवस्थान आहे.
भक्ताच्या हाकेला धावणाऱ्या देवी पार्वतीचं उग्ररुप मानलं जातं.
श्रीवर्धन तालुक्यात अगस्ती मुनींनी सोमजाईची स्थापना केली असे मानले जाते. त्याचा जिर्णोद्धार पेशव्यांनी केलेला आहे.
सोमजाई व हरिहरेश्र्वराचे दर्शन एकाच दिवशी घेतल्यास दक्षिणकाशी पूर्ण केल्याचे पुण्य मिळते असे मानतात.