टायर पंक्चर झाला तरी कार थांबत नाही! Run-Flat Tyre म्हणजे नेमकं काय?

Automobile

21 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Run-Flat Tyre म्हणजे काय?

Run-Flat Tyre हा असा टायर आहे, जो हवा निघाल्यानंतरही मर्यादित अंतर आणि वेगाने वाहन चालवण्यास मदत करतो.

Picture Credit: Pinterest

कसा काम करतो?

या टायरच्या साइडवॉल अधिक मजबूत असतात. त्यामुळे हवा कमी झाल्यानंतरही टायर लगेच कोसळत नाही.

Picture Credit: Pinterest

किती अंतर चालतो?

बहुतेक Run-Flat Tyres पंक्चर झाल्यानंतर सुमारे 80 किमी आणि 80 किमी/तास पर्यंतच्या वेगाने चालवता येतात. (नेमकी मर्यादा कंपनीनुसार बदलू शकते.)

Picture Credit: Pinterest

फायदे

– रस्त्यात लगेच टायर बदलण्याची गरज पडत नाही. – हायवेवर अधिक सुरक्षितता मिळते. – जवळच्या सर्व्हिस सेंटरपर्यंत पोहोचणे सोपे होते.

Picture Credit: Pinterest

तोटे

– किंमत सामान्य टायरपेक्षा जास्त असते. – बदलण्याचा खर्चही अधिक असू शकतो. – सर्व गॅरेजमध्ये दुरुस्तीची सुविधा उपलब्ध असेलच असे नाही.

Picture Credit: Pinterest

कोणत्या कारमध्ये मिळतात?

BMW, Mercedes-Benz, MINI आणि काही प्रीमियम कारमध्ये Run-Flat Tyres फॅक्टरी फिटेड दिले जातात. काही इतर मॉडेल्समध्ये ते पर्याय म्हणून उपलब्ध असतात.

Picture Credit: Pinterest

प्रत्येकासाठी योग्य आहेत का?

जर तुमचा प्रवास हायवेवर जास्त असेल किंवा अतिरिक्त सुरक्षिततेला प्राधान्य असेल, तर Run-Flat Tyres चांगला पर्याय ठरू शकतात.

Picture Credit: Pinterest

सुरक्षिततेसाठी स्मार्ट पर्याय

Run-Flat Tyres पंक्चर झाल्यानंतरही काही अंतर सुरक्षितपणे प्रवास करण्याची सुविधा देतात, पण ते नियमित टायरची पूर्ण जागा घेत नाहीत.

Picture Credit: Pinterest