ड्रायव्हरला डुलकी लागताच कार देणार अलर्ट! काय आहे हे स्मार्ट तंत्रज्ञान?

Automobile

21 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Driver Monitoring System म्हणजेच DMS ही कारमधील एक स्मार्ट सेफ्टी टेक्नॉलॉजी आहे. कॅमेरा आणि सेन्सर्सच्या मदतीने ही सिस्टीम ड्रायव्हरच्या हालचालींवर लक्ष ठेवते.

काय आहे Driver Monitoring System?

Picture Credit:pinterest

कारच्या डॅशबोर्ड किंवा स्टीयरिंग कॉलमजवळ बसवलेला कॅमेरा ड्रायव्हरच्या चेहऱ्याचे निरीक्षण करतो. डोळ्यांची उघडझाप, पापण्यांची हालचाल आणि डोके कोणत्या दिशेला आहे, याची माहिती सिस्टीम घेते.

ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर ठेवते लक्ष

Picture Credit:pinterest

ड्रायव्हरचे डोळे बराच वेळ बंद राहणे, वारंवार जांभई देणे किंवा डोके खाली झुकणे अशा गोष्टी सिस्टीम टिपते. या हालचालींमधून ड्रायव्हरला थकवा किंवा झोप येत असल्याचा अंदाज घेतला जातो.

झोपेची लक्षणे कशी ओळखते?

Picture Credit:pinterest

ड्रायव्हरला डुलकी लागण्याची शक्यता दिसताच सिस्टीम अलर्ट देते. यासाठी कारमध्ये बीप आवाज, डॅशबोर्डवरील चेतावणी किंवा व्हायब्रेशनचा वापर केला जाऊ शकतो.

झोप येताच मिळतो अलर्ट!

Picture Credit:pinterest

काही Driver Monitoring Systems ड्रायव्हरचे लक्ष रस्त्यावर आहे की नाही, हेही तपासतात. ड्रायव्हर वारंवार मोबाईल किंवा इतर गोष्टींकडे पाहत असल्यास सिस्टीम त्याला सतर्क करू शकते.

फक्त झोपच नाही, विचलितपणावरही नजर

Picture Credit:pinterest

या तंत्रज्ञानामध्ये इन्फ्रारेड कॅमेरा, इमेज प्रोसेसिंग आणि काही मॉडेल्समध्ये AI अल्गोरिदमचा वापर होतो. त्यामुळे कमी प्रकाशातही ड्रायव्हरच्या डोळ्यांच्या हालचाली टिपणे शक्य होते.

कॅमेरा आणि AI ची मदत

Picture Credit:pinterest

अनेक आधुनिक कारमध्ये Driver Monitoring किंवा Driver Attention Warning यांसारखी फीचर्स दिली जातात. मात्र, प्रत्येक कारमधील तंत्रज्ञान आणि त्याची कार्यपद्धती वेगळी असू शकते.

कोणत्या कारमध्ये मिळते हे फीचर?

Picture Credit:pinterest

Driver Monitoring System ड्रायव्हरला वेळेत सावध करण्यास मदत करते. मात्र, हे तंत्रज्ञान अपघात पूर्णपणे रोखू शकत नाही. झोप येत असल्यास अलर्टकडे दुर्लक्ष न करता सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवून विश्रांती घेणे आवश्यक आहे.

अपघात टाळण्यासाठी किती उपयुक्त?

Picture Credit:pinterest