Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
2025 मध्ये आकाशात एक दुर्मिळ खगोलीय स्फोट होणार आहे आणि यावेळी एक मृत तारा पुन्हा दिसणार आहे.
या ताऱ्याचे नाव टी कोरोना बोरेलिस (टी सीआरबी) आहे आणि त्याला "ब्लेझ स्टार" असेही म्हणतात.
ही एक बायनरी स्टार सिस्टीम आहे, म्हणजेच दोन तारे जे एकमेकांभोवती फिरतात.
दर ८० वर्षांनी त्याचा एक मोठा स्फोट होतो, ज्याला नोव्हा म्हणतात.
शेवटच्या वेळी १९४६ मध्ये हा तारा अचानक तेजस्वीपणे चमकला आणि नंतर गायब झाला.
आता शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की हा तारा २०२५ च्या मध्यात पुन्हा चमकेल.
यावेळी दुर्बिणीशिवाय आठवडाभर हा तारा उघड्या डोळ्यांनी दिसेल.
रात्रीच्या स्वच्छ आकाशात ते "नॉर्दर्न क्राउन" म्हणजेच कोरोना बोरेलिस नक्षत्रात दिसेल.