www.navarashtra.com

Published Nov 01 2024

By Shweta Chavan

राज्यातील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार, कोण आहेत वंचितच्या शमिभा पाटील? 

Pic Credit -  istockphoto

रावेर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील पहिल्याच तृतीयपंथी अधिकृत उमेदवार ठरल्या आहेत.

पहिल्याच तृतीयपंथी

भुसावळ येथील रहिवासी असलेल्या शमिभा पाटील यांचे मूळ नाव श्याम भानुदास पाटील असे आहे. 

मूळ नाव

फैजपूर येथून त्यांनी एम. ए. मराठीची पदवी घेतली. सध्या त्या कवी ग्रेस यांच्या साहित्यावर पीएच.डी. करीत आहेत. 

शिक्षण

त्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी अर्थात, नऊ वर्षांपूर्वी तृतीयपंथी असल्याचे जाहीर केले.

तृतीयपंथी 

२०१४ मध्ये त्यांना तृतीयपंथी म्हणून नागरिकत्वदेखील मिळाले.

नागरिकत्व

पोलिस भरतीमध्ये तृतीयपंथींना आरक्षण मिळण्यासाठीदेखील त्यांनी न्यायालयीन लढा दिलेला आहे.

आरक्षण

१९९४

भारतात तृतीयपंथींना १९९४ मध्ये प्रथमच मतदानाचा अधिकार मिळाला होता.

मध्य प्रदेशमधील भोपाळमधून शबनम मावशी या भारतातील पहिल्या तृतीयपंथी खासदार म्हणून निवडून आलेल्या होत्या.

 तृतीयपंथी खासदार

वाढतोय टेंशन? खा 'हे' खाद्यपदार्थ; डिप्रेशन होईल छूमंतर