पंचमुखी बेलपत्र म्हणजे ज्या बेलपत्राला पाच पाने आहेत त्या बेलपत्राला पंचमुखी बेलपत्र म्हणतात.
बेलपत्र भगवान शिवाला खूप प्रिय आहे. श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाला ते अर्पण करणे शुभ मानले जाते.
दोन्ही प्रकारचे बेलपत्र भगवान शिवाला अर्पण करता येते.
मान्यतेनुसार, तीन पान असलेले बेलपत्र देवांच्या त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करते म्हणजेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश
श्रावणामध्ये पंचमुखी बेलपत्र शिवलिंगावर अर्पण केल्याने सर्व दोष नाहीसे होतात
पंचमुखी बेलपत्र हे एक दुर्मिळ आणि शुभ बेलपत्र आहे जे भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी अर्पण केले जाऊ शकते.
श्रावण महिना शिवाला समर्पित आहे. या महिन्यात बेलपत्राचे अनेक उपाय केल्याने फायदा होतो