www.navarashtra.com

Published Sept 6, 2024

By Shubhangi Mere

Pic Credit - Social Media

भारताचा स्टार पॅरिस पॅरालिम्पिक गोल्ड मेडलिस्ट हरविंदर सिंह याने सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आहे. त्याने दुसऱ्यांदा पॅरालिम्पिकमध्ये मेडल नावावर केले आहे.

भारताचा पॅरा आर्चर हरविंदर सिंह यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1991 रोजी कैथल, हरियाणा येथे झाला आहे.

जन्म

हरविंदर हा दीड वर्षाचा असताना डेंग्यू तापाची लागण झाल्यानंतर त्याच्या हालचालीवर गंभीर परिणाम झाला, ज्यामुळे त्याला त्याचे पाय व्यवस्थित हलवता आले नाहीत. 

अपंगत्व

.

२०१२ च्या लंडन पॅरालिम्पिकमधून प्रेरणा घेऊन हरविंदर सिंग याने त्याच्या तिरंदाजी कारकीर्दीची सुरुवात केली.

खेळाची सुरुवात

हरविंदर सिंह याने २०१७ मध्ये झालेल्या पॅरा तिरंदाजी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि सातवे स्थान मिळवले होते.

आंतरराष्ट्रीय पदार्पण

२०१८ मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये त्याने सुवर्णपदकावर नाव कोरलं आणि त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली.

आशियाई गेम्

टोकियो 2020 पॅरालिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत वैयक्तिक गटामध्ये कांस्यपदक जिंकले आहे.

टोकियो पॅरालिम्पिक

2024 मध्ये झालेल्या आर्चरी वर्ल्ड रँकिंग स्पर्धेमध्ये हरविंदरने कांस्यपदक नावावर केले होते.

आर्चरी वर्ल्ड रँकिंग स्पर्धा

एप्रिलमधील ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड आर्चरी ओशनिया 2024 पॅरा ग्रँड प्रिक्समध्ये हरविंदरने कांस्यपदक नावावर केलं होतं.

वर्ल्ड आर्चरी ओशनिया 2024

पॅरालिम्पिक आणि ऑलिम्पिकमध्ये फायनल गाठणारा हरविंदर सिंह हा पहिला भारतीय तिरंदाज ठरला आहे.

पहिला तिरंदाज

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये फायनल गाठून अंतिम फेरीत पोलंडच्या तिरंदाजाला पराभूत करून गोल्ड मेडल नावावर केलं. 

पॅरालिम्पिक चॅम्पियन