भारतीय महाराजांचा अपमान; 10 Rolls-Royceचा केला कचरा वाहण्यासाठी वापर!

Automobile

27 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

भारतीय महाराजांनी घेतलेला Rolls-Royce सोबतचा ‘बदला’ आजही चर्चेत आहे.

राजाचा अपमान अन् Rolls-Royce बनल्या कचरा गाड्या!

Picture Credit: pinterest

हे होते अलवरचे महाराजा जय सिंह प्रभाकर. गाड्या, राजेशाही थाट आणि त्यांच्या काही अनोख्या छंदांसाठी ते प्रसिद्ध होते.

कोण होते हे महाराज?

Picture Credit: pinterest

वृत्तानुसार, 1920च्या आसपास महाराजा जय सिंह लंडनमध्ये Rolls-Royceच्या शोरूममध्ये गेले. ते साध्या कपड्यांत होते. कथेनुसार, तिथे त्यांना योग्य वागणूक मिळाली नाही.

कोण होते हे महाराज?

Picture Credit: pinterest

अपमान झाल्याची भावना मनात ठेवून ते पुन्हा शोरूममध्ये गेले. यावेळी मात्र त्यांचा राजेशाही पोशाख आणि लवाजमा पाहून स्वागताचा अंदाजच बदलला!

राजेशाही पोशाखात पुन्हा एंट्री!

Picture Credit: pinterest

कथेनुसार, महाराजांनी शोरूममधील सहा गाड्या खरेदी केल्या. याशिवाय आणखी चार गाड्या भारतात पाठवण्याची ऑर्डर दिल्याचे नमूद आहे.

एकाच वेळी 6 Rolls-Royce!

Picture Credit: pinterest

भारतामध्ये गाड्या आल्यानंतर त्यांचा वापर राजेशाही सवारीसाठी न करता… कथेनुसार, त्या कचरा गोळा करण्यासाठी वापरण्याचा आदेश देण्यात आला!

पण गाड्यांचा वापर कशासाठी केला?

Picture Credit: pinterest

जगातील आलिशान कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गाड्या कचरा वाहून नेत असल्याची ही कहाणी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली. यातून महाराजांचा संदेश स्पष्ट होता—माणसाची किंमत त्याच्या कपड्यांवरून ठरवू नका.

Rolls-Royceचा झाला ‘कचरा ट्रक’!

Picture Credit: pinterest

 कथेनुसार, Rolls-Royceकडून महाराजांना माफी मागण्यात आली आणि कचरा वाहतुकीसाठी गाड्यांचा वापर थांबवण्याची विनंती करण्यात आली.कथेत कंपनीने आणखी गाड्या देण्याची ऑफर केल्याचाही उल्लेख आहे.

कंपनीने मागितली माफी?

Picture Credit: pinterest

ही गोष्ट आजही इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात सांगितली जाते. मात्र उपलब्ध वृत्तांमध्येही ती legend/कथित घटना म्हणून मांडली जाते. म्हणूनच ही कथा ऐतिहासिक तथ्य म्हणून नव्हे, तर भारतातील सर्वाधिक चर्चिलेल्या Rolls-Royce legendsपैकी एक म्हणून पाहणे योग्य ठरेल.

कथा खरी की फक्त प्रसिद्ध आख्यायिका?

Picture Credit: pinterest