लालबागच्या राजाच्या प्रसादाची ‘Power’ कमाल! ‘Prasad to Power’ उपक्रम चर्चेत

Science Technology

12 Sep 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

BMC आणि लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने ‘Prasad to Power’ हा उपक्रम सुरू केला आहे. उत्सवात निर्माण होणाऱ्या सेंद्रिय कचऱ्याचा ऊर्जेसाठी वापर केला जाणार आहे.

Prasad to Power

Picture Credit: Pinterest

11 दिवसांच्या गणेशोत्सवात प्रसाद, अन्न आणि फुलांमधून दररोज सुमारे 8 ते 10 मेट्रिक टन ओला कचरा जमा होण्याचा अंदाज आहे.

रोज किती कचरा?

Picture Credit: Pinterest

लालबागमधून जमा केलेला सेंद्रिय कचरा BMCच्या बायोमिथेनेशन प्लांट्समध्ये नेला जाईल. या प्रक्रियेत कचऱ्यापासून बायोगॅस आणि त्यातून वीज तयार केली जाणार आहे.

कचऱ्याचे काय होणार?

Picture Credit: Pinterest

कचरा नायर, कस्तुरबा, GTB आणि सायन हॉस्पिटल येथील BMCच्या बायोमिथेनेशन प्लांटमध्ये नेला जाणार आहे. प्रत्येक प्लांटची क्षमता सुमारे 2 टन ओला कचरा प्रतिदिन आहे.

कुठे होणार प्रक्रिया?

Picture Credit: Pinterest

या उपक्रमात किमान 80 मेट्रिक टन सेंद्रिय कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे लक्ष्य आहे. त्यातून सुमारे 7,744 युनिट अक्षय वीज तयार होण्याचा अंदाज आहे.

किती वीज तयार होईल?

Picture Credit: Pinterest

तयार होणारी वीज रुग्णांच्या वॉर्ड्स, कॉरिडॉर आणि कॉमन एरियातील वीजपुरवठ्यासाठी वापरण्याचे नियोजन आहे.

वीज कुठे वापरणार?

Picture Credit: Pinterest

वीज निर्मितीचे प्रत्यक्ष प्रमाण कचऱ्याचे प्रमाण, गुणवत्ता आणि योग्य Segregation यावर अवलंबून असेल. त्यामुळे ओला कचरा योग्य पद्धतीने वेगळा करणे महत्त्वाचे आहे.

एक महत्त्वाची अट

Picture Credit: Pinterest

मोठ्या सार्वजनिक उत्सवांमधून निर्माण होणाऱ्या सेंद्रिय कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावून त्याचे ऊर्जेत रूपांतर करता येते, हे दाखवण्याचा BMCचा हा प्रयोग आहे.

उत्सवातून ‘Green Energy’

Picture Credit: Pinterest