मेंदूला तल्लख करणारे पदार्थ!

Life style

08 November, 2025

Author:  नुपूर भगत

 ओमेगा-३ फॅटी ॲसिड असल्याने दररोज काही बदाम आणि अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते आणि एकाग्रता सुधारते.

अक्रोड आणि बदाम

Picture Credit: Pinterest

या मासांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात असते, जे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक आहे.

सॅल्मन, सार्डिन, ट्यूना

Picture Credit: Pinterest

हळदीतील ‘कर्क्युमिन’ हा घटक मेंदूतील सूज कमी करतो आणि मेंदूच्या पेशींचं संरक्षण करतो. यामुळे स्मरणशक्ती सुधारते.

 हळद

Picture Credit: Pinterest

या फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेंदूला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात. यामुळे मेंदू सतर्क राहतो.

 ब्लूबेरी-काळी द्राक्षे

Picture Credit: Pinterest

या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के, फोलेट आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतात.

हिरव्या पालेभाज्या

Picture Credit: Pinterest

अंड्यातील कोलीन हे पोषक तत्व मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर निर्माण करते. यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि निर्णयक्षमता वाढते.

अंडी

Picture Credit: Pinterest

डार्क चॉकलेटमधील फ्लॅव्होनॉइड्स आणि ग्रीन टीमधील अँटिऑक्सिडंट्स मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतात, मूड आनंदी ठेवतात.

डार्क चॉकलेट-ग्रीन टी

Picture Credit: Pinterest