टूथपेस्टने या घरगुती वस्तू होतील स्वच्छ

Business

05 February 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

दात साफ करण्यासाठी टूथपेस्टचा वापर केला जातोच त्यासोबतच वस्तू स्वच्छ करण्यासाठी देखील याचा वापर करता येऊ शकतो.

टूथपेस्टचा वापर 

Picture Credit: Pinterest

भिंतींवर क्रेऑन मार्करचे चिन्ह असते. त्यासाठी ती भिंत पहिले ओल्या कपड्याने पुसून घ्या आणि त्यावर टूथपेस्ट लावा आणि परत ओल्या कपड्याने पुसून घ्या. त्यामुळे तुमचे डाग दूर होतील. 

क्रेऑन मार्करचे डाग

Picture Credit: Pinterest

घरामध्ये तांब्याच्या भांडी असल्यास ते स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्टचा वापर करावा. यामध्ये थोडं ब्रेकिंग सोडा टाकून पेस्ट तयार करा. भांडी ला ही पेस्ट लावून ते स्वच्छ करा. 

तांब्याच्या वस्तू 

Picture Credit: Pinterest

शॉवर डोअर वर नेहमी डाग असतो. ते स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्टचा वापर करा आणि ओल्या कपड्याने स्वच्छ करा. आरसा स्वच्छ होईल.

शॉवर डोअर स्वच्छ करा 

Picture Credit: Pinterest

टूथपेस्टमुळे चांदीच्या भांडी आणि ज्वेलरी स्वच्छ करू शकता. यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.

चांदीच्या ज्वेलरी 

Picture Credit: Pinterest

तुमच्या घरात पांढऱ्या वस्तू असल्यास त्या स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्टचा वापर करू शकता. जसे की  स्विच बोर्ड, सिरॅमिक कप

पांढऱ्या गोष्टी

Picture Credit: Pinterest

स्टेनलेस स्टीलच्या गोष्टी आणि क्रोमियम प्लेटेड सारख्या गोष्टी जसे की पाण्याचे टॅप, सिंकचे टोक इत्यादी टूथपेस्टने स्वच्छ करा.

स्टीलच्या गोष्टी

Picture Credit: Pinterest