कढईत बटर किंवा तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
आलं-लसूण पेस्ट घालून एक मिनिट परता. नंतर टोमॅटो घालून ते मऊ होईपर्यंत शिजवा.
Picture Credit: Pinterest
आता हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला आणि मीठ घालून मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परता.
Picture Credit: Pinterest
उकडलेली मटार घालून सगळं मिश्रण एकत्र करा. गरज असल्यास थोडं पाणी घालून घट्ट भाजी तयार करा.
Picture Credit: Pinterest
शेवटी लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
Picture Credit: Pinterest
आता पाव मधून कापून तव्यावर थोडं बटर लावून भाजीसह दोन्ही बाजूंनी हलकेसे भाजून घ्या.
Picture Credit: Pinterest
गरमागरम मसाला पाव तयार! भाजलेल्या पावसोबत मसाला सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest