Published Dev 06, 2024
By Narayan Parab
Pic Credit - iStock
गुळाचा चहा हा कार्बोहायड्रेट्सने युक्त असतो, जो शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करतो.
गुळाचा चहाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यात झिंक आणि सेलेनियम सारखी आवश्यक खनिजे असतात.
गुळाच्या चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात.
गुळाच्या चहामध्ये पोटॅशियम असते ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होतो.
गुळाचा चहा पिल्याने पचन व्यवस्थित होते. गॅस, अँसिडिटी हे त्रास दूर होतात. गुळात कृत्रिम गोडवा नसतो.
गुळात लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने गुळाचा चहा प्यायल्याने शरीरास लोह मिळते. ज्यामुळे रक्ताची कमतरता भरुन निघू शकते.
.
अशा असंख्य फायद्यांमुळेच गुळाचा चहा हा साखरेच्या चहाला एक उत्तम पर्याय ठरत आहे.
.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गुळाच्या चहाचे सेवन करावे