केसांच्या वाढीसाठी ही तेल आहेत सर्वोत्तम

Business

09 February 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

केसांच्या खोल पोषणासाठी नारळाचे तेल हे सर्वात विश्वासार्ह तेल मानले जाते. त्यात असलेले फॅटी अ‍ॅसिड टाळूमध्ये खोलवर जातात आणि केसांची मुळे मजबूत करतात.

नारळाचे तेल

Picture Credit: Pinterest

एरंडेचे तेल केसांच्या वाढीसाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेले रिसिनोलिक ॲसिड रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे नवीन केसांची वाढ होण्यास मदत होते.

एरंडेल तेल

Picture Credit: Pinterest

आवळ्याचे तेलामध्ये विटामीन सीचे प्रमाण असते. यामुळे केस पांढरे होण्यापासून वाचतात. तसेच कोंड्याची समस्या दूर होते.

आवळ्याचे तेल

Picture Credit: Pinterest

आयुर्वेदामध्ये भृंगराजला केशराज म्हणतात. हे तेल केसांच्या मुळांना पोषण देते आणि केस गळती नियंत्रित करते. यासाठी भृंगराज तेल खूप फायदेशीर आहे.

भृंगराज तेल

Picture Credit: Pinterest

बदामाच्या तेलामध्ये विटामीन ई, मॅग्नेशिअम, ओमेगा फॅटी अ‍ॅसिड असते. हे केसांना मजबूत आणि मऊ बनवते. 

बदामाचे तेल

Picture Credit: Pinterest

कांद्याचे तेल सल्फरने समृद्ध असते, जे केसांच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. हे टाळूमध्ये कोलेजनचे उत्पादन वाढवते, जे नवीन केसांच्या वाढीस मदत करते आणि केस जाड दिसतात.

कांद्याचे तेल

Picture Credit: Pinterest

ऑलिव्ह ऑइल टाळूला खोलवर ओलावा देण्यास मदत करते. हे कोरडे आणि खराब झालेले केस दुरुस्त करते आणि दुभंगलेले टोक कमी करते. यामुळे केस रेशमी आणि चमकदार देखील होतात.

ऑलिव्ह तेल

Picture Credit: Pinterest