www.navarashtra.com

Published Nov 1,  2024

By  Shubhangi Mere

३१ ऑक्टोबर रोजी आयपीएल २०२५ च्या रिटेन्शनची प्रक्रिया पार पडली, यामध्ये आयपीएल फ्रॅन्चायझींनी रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे दिली आहे.

Pic Credit -  Social Media

आयपीएलमधील अनेक मोठ्या खेळाडूंना फ्रॅन्चायझींनी रिलीज केले आहे, आता कोणत्या खेळाडूंवर फ्रॅन्चायझींनी पैशांचा पाऊस केला यावर एकदा नजर टाका.

आयपीएल २०२५

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला संघामध्ये ठेवण्यासाठी फ्रॅन्चायझींने १८ कोटींचा खिसा रिकामी केला आहे.

संजू सॅमसन

हैदराबाद संघाचा कर्णधार आणि ऑस्ट्रेलियाचा दमदार गोलंदाज पॅट कमिन्स संघामध्ये टिकवून ठेवण्यासाठी १८ कोटी मोजले आहेत. 

पॅट कमिन्स

अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान संघामध्ये ठेवण्यासाठी गुजरात टायटन्सने १८ कोटी मोजले आहेत.

राशिद खान 

भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीला RCB ने २१ करोड खर्च करून संघामध्ये ठेवले आहे. 

विराट कोहली

चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाड आणि रवींद्र जडेजा संघामध्ये कायम ठेवण्यासाठी प्रत्येकी १८ कोटी रक्कम द्यावी लागली आहे.

गायकवाड-जडेजा

वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पुरनला संघामध्ये कायम ठेवण्यासाठी लखनौ सुपर जायंट्सने २१ करोड मोजले आहेत.

निकोलस पुरन

सनराइझर्स हैदराबादने हेनरिक क्लासेनला संघामध्ये कायम ठेवण्यासाठी २३ करोडची रक्कम मोजावी लागली आहे.

हेनरिक क्लासेन

भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल संघामध्ये कायम ठेवण्यासाठी राजस्थानला १८ कोटींची किंमत मोजावी लागली आहे.

यशस्वी जयस्वाल

मुंबई इंडियन्सच्या संघाने भारताचा महत्वाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला संघामध्ये कायम ठेवण्यासाठी १८ कोटी मोजावे लागले आहेत.

जसप्रीत बुमराह