Published Dec 16, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - Social Media
'गर्ल्स विल बी गर्ल्स' हा चित्रपट १८ डिसेंबरला प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. हा एक इंडो-फ्रेंच ड्रामा चित्रपट आहे.
तेलुगू ॲक्शन-कॉमेडी चित्रपट 'मेकॅनिक रॉकी' हा चित्रपट 20 डिसेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
मल्याळम चित्रपट 'पानी' ची कथा एका विवाहित जोडप्यावर आधारित आहे. हा चित्रपट 20 डिसेंबर रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होत आहे.
प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंगची डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्सवर २० डिसेंबरला रिलीज होणार आहे. जी पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
या आठवड्यात अमेरिकन युद्ध नाटक चित्रपट द सिक्स ट्रिपल एट देखील रिलीजसाठी सज्ज आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
या आठवड्यात मूनवॉक हा चित्रपट जिओ सिनेमावर दाखल होणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट 20 डिसेंबर आहे.
हे सगळे आगामी वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ज्यामुळे चाहत्यांची नव्या वर्षाची सुरुवात अत्यंत आनंदात होणार आहे.