Published Feb 2, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
सध्या महाराष्ट्रभरात माघी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने आपण बाप्पाला प्रिय असणाऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.
गणपती बाप्पाला सर्वात प्रिय नैवेद्य म्हणजे मोदक. त्यांना हा गोड पदार्थ अतिशय आवडतात, म्हणूनच गणेश पूजेत मोदक अर्पण करण्याची परंपरा आहे.
गणपतीला दुर्वांचा हार वाहणे शुभ मानले जाते. त्यांच्या पूजेत किमान २१ दुर्वा अर्पण केल्या जातात.
गणपतीला जास्वंद फुल अर्पण करणे शुभ मानले जाते.
गूळ आणि खोबरं हे गणपतीच्या नैवेद्यातील महत्त्वाचे पदार्थ आहेत. हे त्यांना प्रसन्न करण्यासाठी अर्पण केले जातात.
गणपतीला शेंदूर अत्यंत प्रिय आहे. बाप्पाचे अनेक रूपे शेंदुरी रंगाच्या प्रतिमांमध्ये आढळतात.
गणपती बाप्पाला भक्तांची श्रद्धा आणि आनंद प्रिय आहे. त्यामुळे बाप्पाची आराधना शुद्ध मनाने करणे महत्त्वाचे आहे.