www.navarashtra.com

Published On 29 March 2025 By  Mayur Navle

उन्हाळ्यात बाईक चालवताना या गोष्टींची काळजी घ्या

Pic Credit -   iStock

हलक्या रंगाचे आणि हवेशीर कपडे परिधान करा. डोके झाकण्यासाठी हेल्मेटसोबत स्कार्फ वापरा

सूर्यप्रकाशापासून संरक्षण

भरपूर पाणी प्या आणि डिहायड्रेशन टाळा.

हायड्रेटेड राहा

उन्हात जळजळ होऊ नये म्हणून हात, मान आणि चेहऱ्यावर SPF युक्त सनस्क्रीन लावा.

सनस्क्रीन वापरा

वाढत्या उन्हाचा फटका टायरला बसू शकतो, त्यामुळे त्याचा प्रेशर योग्य आहे का हे नियमित तपासा.

बाईकचे टायर तपासा

गरम हवामानामुळे इंजिन अधिक गरम होऊ शकते. योग्य प्रकारे ऑइलिंग आणि कुलंट लेव्हल तपासणे आवश्यक आहे.

इंजिन ओव्हरहिटिंग टाळा

शक्यतो सावलीत किंवा शेडमध्ये बाईक पार्क करा. ऊन्हामुळे बाईकचे पार्ट्स जास्त गरम होऊ शकतात.

डायरेक्ट ऊन्हात पार्किंग टाळा

सूर्यप्रकाश थेट डोळ्यांवर पडू नये म्हणून सनग्लासेस किंवा हेल्मेटची सन  व्हायझर वापरा.

डबल-लेयर ग्लासेस वापरा

उन्हाळ्यात रस्ते जास्त तापलेले असतात, त्यामुळे टायर स्लिप होण्याची शक्यता वाढते. म्हणून स्पीड संतुलित ठेवा.

स्पीड नियंत्रणात ठेवा