पावसाळा म्हंटलं की ट्रेकिंग आलंच

Lifestyle 

04 June, 2025

Editor: मयूर नवले

पावसाळा अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

पावसाळा 

Picture Credit: iStock

अशा पावसात अनेक जण ट्रेकिंग करण्यास बाहेर पडत असतात. 

गड - किल्ल्यांची भटकंती

पावसाळी वातावरणात ट्रेकिंगला जाताना काय काळजी घ्यावी त्याबद्दल जाणून घेऊयात.

लक्षात घ्या 

ओलसर दगडांमुळे घसरायची शक्यता असते. म्हणूनच चांगली ग्रिप असलेले ट्रेकिंग शूज वापरा.

चांगले शूज वापरा

तुमचे कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अन्नपदार्थ ओलाव्याने खराब होऊ शकतात. त्यामुळे रेन कव्हर असलेली बॅग निवडा.

वॉटरप्रूफ बॅग 

मुसळधार पावसामुळे ट्रेक रद्द होऊ शकतो. हवामानाचा अचूक अंदाज आधीच घ्या.

हवामानाचा अंदाज तपासा

लहान-मोठ्या जखमा, लवकर थकवा किंवा सर्दी-खोकल्यासाठी प्राथमिक औषधं बरोबर ठेवा.

फर्स्ट एड किट

थंडीमध्ये तहान कमी लागते, पण शरीराला पाणी आवश्यक असते. पुरेसे पाणी सोबत ठेवा.

डिहायड्रेशन टाळा