विमानातून पहिल्यांदाच प्रवास करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Written By: Mayur Navle

Source: Pexels

अनेकांचे स्वप्न असते की आपण एकदा तरी विमानातून प्रवास करावा.

विमानातील प्रवास

जर तुम्ही पहिल्यांदाच विमानातून प्रवास करणार असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा.

लक्षात ठेवा

प्रवासाच्या आधीच तुमचे विमान तिकिट, वैध ओळखपत्र तयार ठेवा. ई-तिकिटची प्रिंट काढून ठेवल्यास उत्तम.

पूर्वतयारी आणि तिकिट तपासा

चेक-इन आणि कॅबिन बॅगेजसाठी विमान कंपनीने दिलेल्या वजन मर्यादा पाळा.

सामानाचे योग्य  पॅकिंग करा

घरून निघताना ट्रॅफिकचा अंदाज घेऊन किमान २ ते ३ तास आधी विमानतळावर पोहोचण्याचा प्रयत्न करा.

वेळेत एअरपोर्टवर पोहोचा

एअरपोर्टवर पोहोचल्यावर तुमच्या एअरलाइन्सच्या काउंटरवर जाऊन चेक-इन करा आणि बोर्डिंग पास घ्या.

चेक-इन प्रक्रिया 

सुरक्षा तपासणी दरम्यान बूट, बेल्ट, घड्याळ, मोबाइल व लॅपटॉप बाहेर काढावे लागतात. ते सहजपणे काढता येईल अशा प्रकारे कपडे परिधान करा.

सुरक्षा तपासणी

बोर्डिंग पासवर दिलेले गेट क्रमांक आणि वेळ नीट पाहा.

वेळेवर लक्ष द्या