एका SUV एवढी किंमत, पण बाइक अशी की नजर हटणार नाहीत!

Automobile

07 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

भारतात एंट्री

Ducati ने 2026 Multistrada V4 Rally भारतात लॉन्च केली आहे. ही प्रीमियम Adventure Touring बाइक लांबच्या प्रवासासाठी तयार करण्यात आली आहे.

Picture Credit: Ducati

किंमत

या बाइकीची एक्स-शोरूम किंमत ₹32.40 लाखांपासून सुरू होते. ही अनेक SUV पेक्षाही महाग आहे.

Picture Credit: Ducati

इंजिन

बाइकमध्ये 1,158cc V4 Granturismo इंजिन आहे. हे इंजिन 170 hp पॉवर आणि 121 Nm टॉर्क देते.

Picture Credit: Ducati

लांबच्या प्रवासासाठी परफेक्ट

30 लिटरची मोठी इंधन टाकी, रुंद सीट, उंच विंडस्क्रीन आणि सुधारित सस्पेन्शनमुळे ही बाइक हजारो किलोमीटरच्या प्रवासातही आरामदायी अनुभव देते.

Picture Credit: Ducati

आधुनिक फीचर्सची रेलचेल

Multistrada V4 Rally मध्ये विविध Riding Modes, Cornering ABS, Traction Control, Cruise Control, Semi-Active Suspension आणि मोठा TFT डिस्प्ले यांसारखी अनेक प्रगत फीचर्स देण्यात आली आहेत.

Picture Credit: Ducati

काय खास?

नवीन इलेक्ट्रॉनिक्स, सुधारित सस्पेन्शन आणि Rear Cylinder Deactivation मुळे रायडिंग अधिक स्मूथ आणि कार्यक्षम होते.

Picture Credit: Ducati

कोणासाठी योग्य?

जर तुम्ही प्रीमियम Adventure Touring बाइकच्या शोधात असाल आणि लांबच्या प्रवासासाठी सर्वोत्तम परफॉर्मन्स, कम्फर्ट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान हवे असेल, तर 2026 Ducati Multistrada V4 Rally हा एक आकर्षक पर्याय ठरू शकतो.

Picture Credit: Ducati