अनेकांना कारल्याचा कडूपणा आवडत नाही मात्र काही उपायांनी हा कडूपणा कमी केला जाऊ शकतो
Picture Credit: iStock
कारल्याची दोन्ही टोकं कापून आतील बिया व पांढऱ्या गराचे भाग काढा. हा भाग कडूपणासाठी जबाबदार असतो.
कारल्याचे पातळ चकत्या किंवा बारीक तुकडे करा. पातळ तुकडे केल्याने त्यातील कडवट रस लवकर बाहेर येतो.
कारल्याच्या तुकड्यांमध्ये भरपूर मीठ (साधारण 1-2 चमचे) टाका आणि मग कारल्याला पाणी सुटू लागले की हे पाणी काढून टाका.
15-20 मिनिटांनंतर कारल्याने पाणी सोडलेले असेल. ते पाणी फेकून द्या व कारल्याचे तुकडे पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
अधिक चव आणि कडवटपणा कमी करण्यासाठी कारल्यावर लिंबाचा रस किंवा थोडेसे दही लावून 10-15 मिनिटे ठेवा, नंतर पुन्हा धुवा.
कडूपणा कमी करण्यासाठी कारल्याचे तुकडे थोडेसे पाण्यात 2-3 मिनिटे उकळून घ्या, आणि नंतर पाणी फेकून द्या.
कारलं भाजताना त्यात कांदा, लसूण, टोमॅटो, गूळ किंवा आमचूर पावडर वापरल्याने त्याची चव सुधारते