डास दमट आणि उष्ण हवामानात वाढतात, त्यामुळे उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूंमध्ये ते एक विशेष गंभीर समस्या बनतात. त्यांच्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया ताप यांसारखे आजारही होऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
कॉइल वापरूनही डास का चावतात? ते खिडक्या किंवा दारांमधून आत येत असतील, पण घरात अशा अनेक जागा असतात जिथे डास लपतात.
Picture Credit: Pinterest
तुमच्या घऱात देखील इकडे तिकडे कपड्यांचा ढिगारा लागला असेल किंवा दरवाजाच्या पाठी कपडे लटकवले असतील तर त्यामध्ये डास लपून बसतात. कपडे काढून ती जागा रिकामी करा.
Picture Credit: Pinterest
जर ते घरातील रोप असेल, तर माती ओलसर राहील इतकेच पाणी द्या. रोपे एकमेकांच्या खूप जवळ ठेवणे टाळा. डास पानांच्या गुच्छातही लपतात, तर कुंड्यांमध्ये साचलेले पाणी डासांच्या अळ्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण पुरवते.
Picture Credit: Pinterest
घराचे कोपरे रिकामे ठेवण्याचा प्रयत्न करा; जर तुम्ही दारामागे किंवा पलंगाखाली वस्तू ठेवल्या तर त्यात डास लपतात.
Picture Credit: Pinterest
कचऱ्याच्या डब्यात ओला कचरा ठेवला असेल तर तिथे देखील डास येऊ शकतात. शक्यतो ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवा. याव्यक्तिरिक्त कचऱ्याच्या डब्याला झाकण लावा.
Picture Credit: Pinterest
घरामध्ये वापरला जाणारा कूलर ही अशी जागा आहे जिथे डासांच्या अळ्यांना प्रजननासाठी अनुकूल वातावरण मिळते. त्यामुळे, कूलरमधील पाणी नियमितपणे बदलले पाहिजे.
Picture Credit: Pinterest