Published Nov 2, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - pinterest
येणाऱ्या वर्षात अभिनेता शाहरुख खानचे अनेक चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
अभिनेत्याचा २०२५ मध्ये किंग हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये अभिनेता त्याची मुलगी सुहानासह काम करणार आहे.
या चित्रपटामध्ये अभिनेता सलमान खान सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
धुम ४ या चित्रपटाबाबत अनेक चर्चा अभिनेत्याला घेऊन सुरू आहेत. या चित्रपटातही अभिनेता काम करताना दिसण्याची शक्यता आहे.
जवान चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेत्याचा जवान २ देखील येणार असून, यामध्ये अभिनेता काम करताना दिसणार आहे.
पठाण २ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून यामध्येही अभिनेता झळकणार आहे.
अभिनेत्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर आता अभिनेता आगामी काळातही धमाका करणार आहे.