उच्च रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी टिप्स

Lifestyle

30 April 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

उन्हाळ्यात उच्च रक्तदाब 

उन्हाळ्यात वाढते ऊन आणि डीहायड्रेशनमुळे उच्च रक्तदाबाची समस्या वाढू शकते. शरीरात पाण्याची कमतरता, जास्त घाम येणे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे रक्तदाब असंतुलित होते. ज्यामुळे चक्कर येणे, थकवा आणि डोकेदुखी होऊ शकते. 

Picture Credit: Pinterest

उन्हाळ्यात शरीर हायड्रेड ठेवणे गरजेचे आहे. दिवसभर पुरेसे पाणी प्या, नारळाची पाणी आणि लिंबू पाणी देखील प्या. यामुळे शरीराचे संतुलन बनते आणि ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यास मदत करते.

पाण्याचे प्रमाण वाढवा 

Picture Credit: Pinterest

उच्च रक्तदाबाचे रुग्णांनी मिठाचे सेवन कमी करावे. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील पाणी थांबते. ज्यामुळे रक्तदाब वाढतो. प्रोसेस्ड आणि पॅकेट फूडपासून दूर रहाणे फायदेशीर आहे.

मिठाचे सेवन कमी करा 

Picture Credit: Pinterest

उन्हाळ्यात तळलेले पदार्थ खाऊ नका. फळ, भाज्या आणि भरपूर फायबर असलेले पदार्थ आहारामध्ये घ्या. केळ, कलिंगड, काकडी हे पदार्थ शरीराला थंड ठेवतात आणि रक्तदाब कंट्रोल ठेवण्यात मदत करते

 हलके आणि संतुलित जेवण करा

Picture Credit: Pinterest

उच्च रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी चालणे फायदेशीर आहे. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि तणाव कमी होतो. 

रोज व्यायाम करा 

Picture Credit: Pinterest

जास्त ताण घेतल्याने उच्च रक्तदाब वाढू शकतो. मेडिटेशन, मोठे श्वास घेण्याचे व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. त्यामुळे मानसिक शांती मिळते आणि रक्तदाब कंट्रोलमध्ये  राहतो 

तणाव कमी करा 

Picture Credit: Pinterest

उन्हात जास्त वेळ राहिल्याने शरीरावर त्याचा प्रभाव पडू शकतो. बाहेर जाते वेळी छत्री, टोपी, स्कार्फ आणि पाणी सोबत ठेवा. यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते आणि उच्च रक्तदाब वाढण्याचे ताण कमी होते

उन्हापासून बचाव 

Picture Credit: Pinterest