www.navarashtra.com

Published Feb 11,  2025

By  Mayur Navle

HSC exams: परीक्षा देताना मन स्थिर ठेवण्यासाठी काय कराल ?

Pic Credit -  iStock

आज बारावीची परीक्षा सुरु झाली आहे.  राज्यातील 15 लाख विद्यार्थी ही परीक्षा  देणार आहेत. 

12th परीक्षा

अनेकदा परीक्षा देताना विद्याथ्यांच्या मनात घालमेल होत असते. अशावेळी काही सोप्या ट्रिक्सच्या साहाय्याने ते आपले मन  स्थिर ठेवू शकतात. 

मनात असणारे घालमेल

परीक्षेपूर्वी संपूर्ण अभ्यास व्यवस्थित करून ठेवा. तयारी पूर्ण असेल तर आत्मविश्वास वाढेल आणि मन स्थिर राहील.

योग्य तयारी

परीक्षेच्या आधी आणि दरम्यान काही खोल श्वास घ्या. यामुळे तणाव कमी होईल आणि एकाग्रता वाढेल.

श्वासोच्छ्वास नियंत्रित ठेवा

"मी हे करू शकतो" असा आत्मविश्वास बाळगा. नकारात्मक विचार टाळा आणि स्वतःवर विश्वास ठेवा.

सकारात्मक विचार ठेवा

परीक्षा सुरू होण्याच्या आधी हलका पण पौष्टिक आहार घ्या. जड किंवा जास्त तिखट-तेलकट पदार्थ टाळा.

योग्य आहार घ्या

प्रश्नपत्रिका मिळाल्यावर आधी ती नीट वाचा आणि प्रश्नांचे योग्य नियोजन करा. वेळेचा तणाव येणार नाही याची दक्षता घ्या.

वेळेचे व्यवस्थापन 

इतर विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिका भरण्याचे वेग आणि आत्मविश्वास पाहून गोंधळून जाऊ नका. फक्त तुमच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करा.

इतरांशी तुलना करू नका

रिकाम्या पोटी आवळ्याचा चहा पिण्याचे काय आहेत फायदे?