बहुतेक लोक फॉर्मल कपडे परिधान केल्यानंतर त्याखाली पांढरे मोजे परिधान करणे पसंत करतात. पण ते काळे पडल्यास त्याचा त्रास होतो
मोजेतील काळे पण दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाणी याचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण त्या काळेपणावर लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवून टाका
हायड्रोजन पेरोक्साइडचा वापर करून मोज्यांवरील काळेपण दूर होऊ शकतो. काही वेळ हा पदार्थ त्याच्यावर लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा
लिंबाचा रस ही एक नैसर्गिक प्रक्रिया मानली जाते. काळे पण दूर करण्यासाठी लिंबाचा रस खूप उपयोगी पडतो.
खराब झालेले मोजे साफ करण्यासाठी वॉशिंग पावडरचा उपयोग करतात. यामुळे ते स्वच्छ होण्यास मदत होते.
मोज्यातील काळेपण दूर करण्यासाठी ब्लीच एक चांगला पर्याय आहे. हे काही वेळ लावून ठेवल्याने ते स्वच्छ होण्यास मदत होते.
व्हिनेगरचे पाणी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. हे पांढरे मोजे साफ करण्यासाठी उत्तम मानले जाते. याचा आपण वारंवार उपयोग करू शकतो.
गरम पाण्यामध्ये मोजे भिजवून ठेवा आणि नंतर धुवा लगेच स्वच्छ होतील.