Published August 31, 2024
By Dipali Naphade
Pic Credit -iStock
भारतातले 5 स्ट्रीट फूड्स खायलाच हवेत
भारतामध्ये अशी अनेक शहरं आहेत ज्यातील स्ट्रीट फूड्स चवीला अप्रतिम असतात
स्ट्रीट फूड्स अनेक आहेत, पण त्यातील महत्त्वाचे 5 फूड्स नक्की कोणते
.
दिल्लीचे छोले भटूरे हे खूपच प्रसिद्ध आहेत, प्रत्येकाने दिल्लीतील या पदार्थाची चव घ्यायलाच पाहिजे
वाराणसीमधील प्रसिद्ध कचोरी सब्जी ही नाश्त्यामध्ये खाल्ली जाते, ज्याची चव खूपच सुंदर असते
मुंबईची शान म्हणजे वडापाव. भारतीय बर्गर मानला जाणारा वडापाव हे एक उत्तम स्ट्रीट फूड आहे
पंजाबमधील पदार्थांची चवच न्यारी, अमृतसरी कुलचा हे प्रसिद्ध पदार्थ असून छोलेसह खाल्ला जातो
हैदराबादच्या बिर्याणीचं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. हैदराबादला रस्तोरस्ती बिर्याणीची चव तुम्ही घेऊ शकता