Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा हा सर्वांचाच आवडता प्राणी आहे.
असं म्हणतात की कुत्र्याइतका इमानदार दुसरा प्राणी नाही.
याच कुत्र्यांच्या काही अशा जाती आहेत ज्यामुळे त्यांना जगातील सर्वात खतरनाक कुत्रे म्हटलं जातं.
हे कुत्रे मूळचे ब्रिटीशातले आहेत. इतर कुत्र्यांच्या तुलनेत हे कुत्रे सर्वात शक्तीशाली असतात.
पिटबुल कुत्रे सर्वात आक्रमक आणि शक्तीशाली आहेत. ही कुत्रे सर्वात जास्त हिंसक असतात.
१९९३ ते १९९६ दरम्यान, अमेरिकेत कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला.
हा हल्ला करणाऱ्यात राॅटवीलर जातीचे कुत्रे सर्वाधिक होते.
जर्मन शेफर्ड हा सर्वात आक्रमक समजला जातो. याला शारीरिक ताकद मोठ्या प्रमाणात असते.
या कारणासाठी जर्मन शेफर्डला सुरक्षा दलात तपासासाठी घेतलं जातं.
हस्की कुत्र्यांमध्ये खूप हिंसकपणा जास्त असतो.
ही कुत्री पाळीव प्राणी म्हणून नाही तर सुरक्षा विभागात जास्त आढळून येतात.