Tower Fan, Pedestal Fan की Table Fan? तिन्ही दिसतात वेगळे, पण कोणता फॅन आहे सर्वात उपयोगी?

Science Technology

03 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

घरात हवा मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे फॅन वापरले जातात. Tower Fan, Pedestal Fan आणि Table Fan हे त्यापैकी लोकप्रिय पर्याय आहेत. मात्र, तिन्हींची रचना आणि वापरण्याची पद्धत वेगळी आहे.

फॅनचे तीन प्रकार

Picture Credit:pinterest

Tower Fan हा उंच आणि स्लिम डिझाइनचा असतो. यामध्ये आतील इम्पेलर हवा खेचून उभ्या व्हेंट्समधून बाहेर फेकतो. कमी जागेत ठेवता येणे हे याचे वैशिष्ट्य आहे.

Tower Fan म्हणजे काय?

Picture Credit:pinterest

Pedestal Fan हा उंच स्टँडवर बसवलेला असतो. यामध्ये गोल ब्लेड आणि सुरक्षा जाळी असते. याची उंची गरजेनुसार कमी-जास्त करता येते. मोठ्या जागेत हवा पोहोचवण्यासाठी हा उपयोगी ठरतो.

Pedestal Fan ची खासियत

Picture Credit:pinterest

Table Fan आकाराने तुलनेने लहान असतो. टेबल, डेस्क किंवा किचन काउंटरवर ठेवता येतो. समोर गोल ब्लेड आणि जाळी असल्यामुळे याची रचना सहज ओळखता येते.

Table Fan कसा असतो?

Picture Credit:pinterest

Tower Fan कमी फ्लोअर स्पेसमध्ये बसतो. Pedestal Fan ला स्टँडमुळे काही जागा लागते, तर Table Fan साठी टेबल किंवा प्लॅटफॉर्म आवश्यक असतो. त्यामुळे खोलीतील उपलब्ध जागेनुसार निवड करता येते.

जागा कोणता फॅन जास्त व्यापतो?

Picture Credit:pinterest

Pedestal Fan आणि Tower Fan मध्ये Oscillation फीचर असल्यास ते डावीकडून उजवीकडे हवा पसरवू शकतात. Table Fan मध्येही हे फीचर असू शकते. मात्र, हवेचा वेग आणि कव्हरेज हे मॉडेलच्या डिझाइनवर अवलंबून असते.

हवा कोणाचा जास्त भागात पोहोचते?

Picture Credit:pinterest

तिन्ही फॅनचा वीज वापर त्यांच्या मोटरची क्षमता आणि स्पीड सेटिंगवर अवलंबून असतो. तसेच आवाजही मॉडेल, मोटर आणि फॅनच्या गुणवत्तेनुसार बदलतो. त्यामुळे खरेदीपूर्वी Wattage आणि Noise Level तपासणे महत्त्वाचे आहे.

वीज आणि आवाजाच्या बाबतीत कोण पुढे?

Picture Credit:pinterest

– Tower Fan: कमी जागा आणि मॉडर्न डिझाइन हवे असल्यास. – Pedestal Fan: उंची बदलणारा आणि मोठ्या भागात हवा देणारा फॅन हवा असल्यास. – Table Fan: डेस्क किंवा छोट्या जागेसाठी फॅन हवा असल्यास.

कोणता फॅन खरेदी करावा?

Picture Credit:pinterest