Published Feb 24, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - Google
मराठी कुटुंबात नविवाहित जोडप्यांना आशीर्वाद लाभावेत म्हणून जागरण गोंधळाचा कार्यकम केला जातो.
आई तुळजा भवानी आणि खंडेरायाच्या नावे हा जागरण गोंधळ केला जातो.
या गोंधळाचं महत्त्व वेंडीग घर या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन देण्यात आली आहे.
गोंधळ ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे.
केवळ देवदेवतांचे आवाहन करण्यासाठीच नव्हे, तर समाजाला एकत्र आणण्यासाठी गोंधळ केला जातो.
आनंद निर्माण करण्यासाठी आणि चार घटका विरंगुळा म्हणून आपल्या पूर्वजांनी गोंधळाची संकल्पना आणली.
नवीन जोडप्याला आशीर्वाद मिळावे म्हणून गोंधळी गाण्यातून थेट देवांना गोंधळाला येण्याचे आवाहन करतात.
नवीन जोडप्यांचा संसार सुखी व्हावा हाच त्यामागचा उद्देश असतो.