26 July 2005; मुंबईकरांच्या आयुष्यातील भयानक दिवस  

Lifestyle

26 JULY, 2025

Author:  मयूर नवले

आजची 26 जुलै म्हटलं की अनेकाना आठवतो तो  भयंकर पाऊस.

26 जुलै 2005

Img Source: Pinterest

याच दिवशी मुंबईतील मिठी नदीला पूर आला आणि मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले.

पहिल्यांदाच आला पूर

26 जुलै 2005 रोजी मुंबईत केवळ 24 तासांत 944 मिमी पावसाची नोंद झाली.

भीषण पाऊस

शहर ठप्प

मुसळधार पावसामुळे मुंबईचं जनजीवन पूर्णपणे ठप्प झालं होतं. रेल्वे, बस सेवा बंद, रस्ते जलमय झाले.

प्रवाशांचे हाल

अनेक मुंबईकर ऑफिस, शाळा किंवा रेल्वेत अडकले. हजारो लोकांना रस्त्यावरच रात्र  काढावी लागली.

वीज पुरवठा खंडित

या दिवशी वीज पुरवठा खंडित झाला. तसेच, मोबाईल नेटवर्क देखील ठप्प झाले. 

जीवितहानी

मुंबईत उद्भवलेल्या पुरामुळे 1000 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला.

शाळा-कॉलेज बंद

पूरस्थितीमुळे अनेक शाळा आणि कॉलेज बंद ठेवावे लागले.