ब्रेडपासून बनवा या भन्नाट रेसिपी

Life style

21 November 2026

Author:  हर्षदा जाधव

भूक लागली किंवा नाश्ता बनवायचा असेल तर मनात येणारा सर्वात पहिला पदार्थ म्हणजेच ब्रेड-बटर किंवा सँडविच. 

ब्रेड-बटर

Picture Credit: Pinterest

ब्रेडपासून केवळ ब्रेड-बटर किंवा सँडविच नाही तर इतर चविष्ट पदार्थ देखील बनवू शकता.

चविष्ट पदार्थ

Picture Credit: Pinterest

पॅनमध्ये राई, कढीपत्ता, शेंगदाणे, कांदा आणि मिरचीचा तडका देऊन त्यात हळद, मीठ आणि ब्रेडचे छोटे तुकडे मिक्स करा. 

ब्रेड पोहा

Picture Credit: Pinterest

उकडलेला बटाटा, कांदा, मिरची, चाट मसाला आणि कोंथिंबीरचे मिश्रण ब्रेडला लावून रोल तयार करा आणि डीप फ्राय करा. 

क्रिस्पी ब्रेड रोल

Picture Credit: Pinterest

ढोबळी मिरची, टोमॅटो, कांदा आणि चीजचे मिश्रण ब्रेडवर लावा. आता ओव्हनमध्ये किंवा पॅनमध्ये चिज वितळेपर्यंत बेक करा. 

ब्रेड पिझ्झा

Picture Credit: Pinterest

बेसन, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, मीठ आणि ओवा घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण ब्रेडवर लावून टोस्ट करा.

ब्रेड बेसन टोस्ट

Picture Credit: Pinterest

राई, जीरा, टोमॅटो आणि ब्रेडच्या छोट्या तुकड्यांपासून ब्रेड उपमा हा चविष्ट पदार्थ तयार करू शकता. 

ब्रेड उपमा

Picture Credit: Pinterest

ब्रेडचे त्रिकोणी तुकडे तुपात तळून घ्या आणि साखरेच्या पाकात बुडवून आणि त्यावर कापलेले बदाम आणि पिस्ते घालून सजवा.

शाही तुकडा

Picture Credit: Pinterest