गुडघे दुखीवर करा हे उपाय, जाणून घ्या

Lifestyle

10 May 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

गुडघे दुखीची समस्या

हल्ली कमी वयात गुडघे दुखीची समस्या वाढत आहे. जास्त वेळ बसणे, वजन वाढणे, कमकुवतपणा चुकीचे खाणेपिणे इत्यादी कारण असू शकतात. योग्य सवयी लावून या समस्या दूर करा. 

Picture Credit: Pinterest

जास्त वजनाचा प्रभाव वजनावर पडतो. वजन वाढल्याने दुखणे आणि सूज येण्याची समस्या वाढते. योग्य आहार आणि नियमित व्यायाम वजन कंट्रोलमध्ये ठेवते.

वजन नियंत्रणात ठेवा 

Picture Credit: Pinterest

चालणे, स्ट्रेचिंग आणि योगा केल्याने गुडघ्यावरील मांसपेशी मजबूत होतात. यामुळे हाडांना सहाय्य मिळते आणि  दुखण्याची समस्या कमी होते.

रोज व्यायाम करा

Picture Credit: Pinterest

हाड मजबूत ठेवण्यासाठी दूध, दही, पनीर, अंड आणि ऊन नक्की घ्या. शरीरामध्ये विटॅमीन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे गुडघे दुखी वाढू शकते.

कॅल्शियम आणि विटॅमिन डी घ्या

Picture Credit: Pinterest

खूप वेळ एका जागी बसल्याने गुडघे दुखी होऊ शकते. 30 ते 40 मिनिटांनी उठून थोड चाला आणि पाय स्ट्रेच करा

जास्त वेळ बसू नका

Picture Credit: Pinterest

आरामदायक आणि मऊ बूट गुडघ्यावरील दबाव कमी करते. खूप उंच हिल किंवा स्वस्त बूट गुडघे दुखी वाढू शकते.

योग्य बूट घाला

Picture Credit: Pinterest

हळद आणि आल्यामध्ये सूज कमी करण्याचे गुण असतात. हे दूध, चहा किंवा खाण्यामध्ये याचा समावेश केल्याने गुडघे दुखी कमी होऊ शकते आणि आराम मिळू शकतो.

हळद आणि आलं खा

Picture Credit: Pinterest