तूळ संक्रांती खूप शुभ मानली जाते. तूळ संक्रांती दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात येते. यावेळी 17 ऑक्टोबर रोजी आहे.
तूळ संक्रांतीच्या दिवशी या गोष्टींचे दान केल्याने तुमची प्रलंबित कामे हळूहळू पूर्ण होतील. कोणत्या गोष्टींचे दान करावे जाणून घ्या
जर तुम्हाला तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा हवी असल्यास या दिवशी तांब्याचे ताट दान करावे
जे लोक तूळ संक्रांतीला चप्पल बूटांचे दान करतात त्यांचे चांगले दिवस सुरु होतात असे म्हटले जाते. त्यामुळे चप्पल बुटाचे दान करावे
तुम्हाला कर्जासारख्या समस्या असल्यास तूळ संक्रांतीला कपड्याचे दान करावे. यामुळे तुमच्या समस्या दूर व्हायला लागतील
तूळ संक्रांतीला अन्नाचे दान केल्याने देवी अन्नपूर्णा प्रसन्न होते. त्यामुळे व्यक्तीला कधीही अन्नाची कमतरता भासत नाही
तूळ संक्रांतीच्या वेळी गरजूवंतांना छत्रीचे दान केल्याने प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते.
तूळ संक्रांतीच्या वेळी दान करणे सामान्य दिवसांपेक्षा ते कितीतरी पटीने जास्त फलदायी असते. असे मानले जाते की, हे दान केल्याने सर्व पाप दूर होतात असे म्हटले जाते.