Published August 26, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Pintrest
श्रीमंतीसाठी जन्माष्टमीच्या दिवशी करा तुळशीचे उपाय
पंचांगानुसार 26 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी असून भगवान कृष्णाला 56 भोग लाऊन पूजा केली जाते
25 ऑगस्ट रात्री 03 वाजून 39 मिनिट्सने अष्टमीला सुरूवात झाली असून 26 ऑगस्ट रोजी रात्री 02 वाजून 19 मिनिट्सने संपेल
.
या दिवशी तुळशीचे उपाय केल्यास वर्षभर संपत्ती कमी होत नाही. याशिवाय व्यापारात वृद्धी होते
जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीचे रोप लावणे शुभ असते. असे केल्याने लक्ष्मीमातेचे घरी आगमन होते
वैवाहिक आयुष्यात येणारी संकटे दूर होण्यास मदत मिळते
तुळशीला या दिवशी लाल रंगाची ओढणी अर्पण केल्यास यशप्राप्ती होते आणि कार्यातील बाधा नाहीशी होते
तुळशीपाशी तुपाचा दिवा तेवत ठेवावा आणि 11 प्रदक्षिणा घालाव्या, पैशाची कमतरता भासत नाही
जन्माष्टमीच्या दिवशी 3-5 तुळशीची पानं लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावीत. गरीबीपासून मुक्तता मिळते
ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय असून आम्ही कोणताही दावा करत नाही