TVS Raider 125 SSE ला मिळाला भन्नाट नवा रंग! किंमतही वाढली

Automobile

31 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

TVS ने Raider 125 SSE व्हेरिएंटला नवीन आकर्षक रंगसंगतीसह अपडेट केले आहे. यामुळे ही स्पोर्टी 125cc बाईक आता आणखी स्टायलिश दिसते.

TVS चे मोठे अपडेट

Picture Credit: pinterest

SSE व्हेरिएंटमध्ये आधीपासून असलेल्या थीम्ससोबत नवीन रंगांचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक वैविध्यपूर्ण पर्याय मिळणार आहेत.

नवीन रंगामुळे लूक अधिक आकर्षक

नवीन अपडेटसोबत TVS Raider 125 च्या विविध व्हेरिएंटच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. SSE व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत आता ₹93,520 झाली आहे.

किंमतीतही वाढ

बाईकमध्ये पूर्वीप्रमाणेच 124.8cc Air & Oil Cooled इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन दमदार परफॉर्मन्ससोबत दैनंदिन वापरासाठी उत्तम मायलेजही देते

इंजिनमध्ये कोणताही बदल नाही

SSE व्हेरिएंटमध्ये LED लाइटिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्पोर्टी डिझाइन आणि आरामदायी सीट यांसारखी वैशिष्ट्ये कायम ठेवण्यात आली आहेत.

फीचर्स कायम

स्पोर्टी लूक, आकर्षक ग्राफिक्स आणि दमदार परफॉर्मन्समुळे Raider 125 SSE हा कॉलेज विद्यार्थी आणि तरुण रायडर्समध्ये लोकप्रिय पर्याय ठरत आहे.

तरुणांसाठी खास पर्याय

जर तुम्हाला स्टायलिश 125cc बाईक, चांगला परफॉर्मन्स आणि आधुनिक लूक हवा असेल, तर नवीन TVS Raider 125 SSE नक्कीच विचार करण्यासारखा पर्याय आहे.

घ्यावी का ही बाईक?