TVS Roninच्या चाहत्यांना झटका! सर्व 6 व्हेरिएंट्स महागले

Automobile

21 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

TVS Ronin खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने बाइकच्या सर्व व्हेरिएंट्सच्या किंमती वाढवल्या आहेत.

TVS Ronin महागली!

Picture Credit:pinterest

TVS Roninच्या किमतीत व्हेरिएंटनुसार ₹1,000 ते ₹1,800 पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

किती झाली किंमतवाढ?

Picture Credit:pinterest

Ronin Agonda Editionची किंमत १.३३ लाख झाली आहे. या व्हेरिएंटवर तब्बल १,८०० ची वाढ झाली आहे.

Agonda Edition सर्वाधिक महाग

Picture Credit:pinterest

Ronin Base Lightning Black आता १,३०,२९० आणि Magma Red व्हेरिएंट १,३१,९९० मध्ये उपलब्ध आहे. दोन्हींच्या किमती अनुक्रमे १,६०० आणि १,५०० ने वाढल्या आहेत.

बेस व्हेरिएंटची नवी किंमत

Picture Credit:pinterest

Glacier Silverची किंमत आता १,५०,०४०, तर Charcoal Emberची किंमत १,५१,३४० झाली आहे. दोन्ही मॉडेल्सवर १,००० ची वाढ करण्यात आली आहे.

Mid व्हेरिएंट्सही महागले

Picture Credit:pinterest

TVS Roninच्या Top व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत आता १,६२,६४० झाली आहे. या मॉडेलवरही १,००० ची वाढ झाली आहे.

Top व्हेरिएंटची किंमत

Picture Credit:pinterest

किंमत वाढली असली तरी Roninमध्ये मेकॅनिकल बदल करण्यात आलेला नाही. बाइकला 225cc सिंगल-सिलिंडर ऑइल-कूल्ड इंजिन मिळते.

इंजिनमध्ये बदल नाही

हे इंजिन 20.43 PS पॉवर आणि 19.93 Nm टॉर्क तयार करते. त्यामुळे रोजच्या वापरासोबत वीकेंड राइडसाठीही Ronin एक आकर्षक पर्याय आहे.

किती पॉवर मिळते?

Picture Credit:pinterest

किंमतवाढीनंतरही Roninचे प्रमुख फीचर्स आणि रायडिंग सेटअपमध्ये बदल झालेला नाही. बाइक आपल्या आरामदायी राइडिंग पोझिशन आणि स्मूथ पॉवर डिलिव्हरीसाठी ओळखली जाते.

फीचर्सचा सेटअप कायम

Picture Credit:pinterest

किंमत वाढली असली तरी वाढ तुलनेने मर्यादित आहे. त्यामुळे Ronin खरेदी करण्याचा प्लॅन असलेल्या ग्राहकांसाठी ही वाढ फार मोठा अडथळा ठरण्याची शक्यता कमी आहे.

खरेदीचा निर्णय बदलणार?

Picture Credit:pinterest

TVS Roninची एक्स-शोरूम किंमत आता 1,30,290 पासून सुरू होऊन 1,62,640 पर्यंत जाते. त्यामुळे बजेटनुसार योग्य व्हेरिएंट निवडता येईल.

आता किंमत कितीपासून?

Picture Credit:pinterest